खड्डे, अडथळे, अनधिकृत हातगाड्या व केडीएमसी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे कल्याण शीळ रोडवर होतेय वाहतूक कोंडी…
dombivali – डोंबिवली पूर्वेतील कल्याण शीळ रोड या राज्य महामार्गावर विविध ठिकाणी ( गोळवली, पांडुरंग वाडी, रिजन्सी चौक, विद्या निकेतन कट ) असलेल्या खड्यांमुळे तसेच पडलेली दगड, गोटे, चौकांमध्ये लागणाऱ्या अनधिकृत हातगाड्या, फूट पाथवर भाजी विक्रेते आणि या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करणारे कल्याण डोंबिवली मनपा चे अधिकारी यांच्यामुळे नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण वरून शीळफाटा कडे जाताना उंबर्लीकडे कडे जाण्याच्या वळणावर त्याठिकाणी रस्त्यातच इलेक्ट्रिक पोल, डीपी, दगडांचे खच, फेरीवाले, हातगाड्या, टपऱ्या आहेत,खराब रस्ता तसेच उंबरली कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला पाण्याचे चेंबर आहेत. या सर्व समस्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसोबत सामना करावा लागतो आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून शिळफाटा रोडवर वाहतुकीची कोंडी होत आहे.
महापालिकेने याची तात्काळ दखल घेऊन या समस्या सोडवाव्यात आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी मागणी आता तेथील स्थानिक नागरिक करत आहेत.