मुंबई
शिवशाही बस बाबत एसटी महामंडळाकडून मोठा खुलासा!…
mumbai – गेल्या काही दिवसांपासून राज्याभरात धावणारी शिवशाही बस बंद होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांबाबत आता एसटी महामंडळाकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. शिवशाही बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नसल्याचे एसटी महामंडळाने म्हंटले आहे.
एसटी महामंडळाने याबाबत ट्विट करत सांगितले आहे कि, एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित) बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही.