विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून पंचसूत्री जाहीर…
mumbai – महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजने अंतर्गत प्रति महिना ३००० रुपये देणार तसेच महिलांसाठी व मुलींसाठी बस प्रवास मोफत देणार असल्याचे राहुल गांधी यांनी पंचसूत्रीत जाहीर केलं आहे.
यासोबतच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
मुंबई येथील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांच्या उपस्थित महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, जेष्ठ शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडी कडून जाहीर करण्यात आलेली पंचसूत्री…
१. कुटुंब रक्षण नावाने 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा कवच मिळणार
२. महिलांना दरमहा तीन हजार रुपये
३. समानतेची हमी दिली जाईल आणि जातीची जनगणना केली जाईल आणि 50 टक्के आरक्षण काढून त्यात वाढ केली जाईल.
४ शेतकऱ्यांची तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. कर्जाची नियमित परतफेड केल्यास पन्नास हजारांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.
५. तरुणांना दरमहा 4,000 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल.