देश

अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदनाचे भूमिपूजन संपन्न!…

mumbai –  अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. हे भक्त सदन उभारण्यासाठी राज्य शासनाने जूनमध्ये जमीन घेतली होती. या जागेवर पर्यावरणपूरक हरित इमारत (environmental friendly green building) बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

९५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर १२ मजली भव्य भक्त निवास उभे राहणार असून त्या ठिकाणी ६५० पर्यटक राहू शकतील. भक्त निवासात  एकूण ४ व्हीआयपी कक्ष, ९६ खोल्या असून ४० डॉर्मिटरी बांधण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हे भक्तनिवास अयोध्येतील महत्त्वाच्या सर्व स्थळांपासून जवळ आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळपासून ११.५ किमी, श्रीराम जन्मभूमी मंदिर पासून ७.५ कि.मी. तर अयोध्या रेल्वे जंक्शनपासून ४.५ किमीवर आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्या हनुमान गढीचे महंत राजू दासजी महाराज, अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर गिरीशपती त्रिपाठी, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page