मुंबई
मंत्रालयात धनगर आंदोलकांचा गोंधळ…
mumbai – आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला असून, मंत्रालयात धनगर समाजाच्या आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी थेट संरक्षण जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन केलं. त्यावेळी मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला.
धनगर समजाला आदिवासी कोट्यातील आरक्षण मिळावं, अशी मागणी धनगर समाजाच्या आंदोलकांची आहे. या मागणीसाठी आंदोलकांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळ्यांवर उडी मारुन आंदोलन केलं.
आंदोलक राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी उपोषण करायला बसले होते. अखेर ते आज मंत्रालयात आले आणि त्यांनी संरक्षण जाळ्यांवर उड्या मारत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं.