महाराष्ट्र
अमरावतीत बस पुलावरून खाली कोसळली…
amravti – अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बस पुलावरुन खाली कोसळली. बस थेट पाण्यात कोसळली बसमध्ये ५० पेक्षा अधिक प्रवासी होते, त्यातील अनेक जण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हि बस अमरावतीहून धारणी येथे जात होती. प्राथमिक माहितीनुसार, मेळघाट मधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली बस कोसळली.