मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गाडीत आढळला मृतदेह…

मुंबई – मुंबई-गोवा हायवे लगत एका फार्म हाऊसच्या जवळ एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर एक ऑडी कार बऱ्याच वेळापासून उभी होती. स्थानिक व्यक्तींनी तात्काळ पनवेल तालुका पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यात एक मृतदेह सापडला. मृतदेह मागील दोन दिवसांपासून गाडीत होता.

दरम्यान, मृत व्यक्तिचे नाव संजय कार्ले असे असून, तो सोन्याची बनावट नाणी विकून अनेकांची फसवणूक करायचा. त्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. अशी माहिती समोर आली आहे.