विधानसभा निवडणुकीसाठी वंचितची पहिली यादी जाहीर…
akola – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
या यादीत मराठा, बौद्ध, मुस्लीम, ओबीसी, भटक्या जमातीच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच रावेर विधानसभा मतदार संघातून शमिभा पाटील या तृतीयपंथीला उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचितचे ११ उमेदवार पुढीप्रमाणे…
रावेर – शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील),
सिंदखेड राजा – सविता मुंढे (वंजारी),
वाशिम – मेघा किरण डोंगरे (बौद्ध),
धामणगाव – नीलेश विश्वकर्मा (लोहार),
नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे (बौद्ध),
साकोली – डॉ. अविनाश नन्हे (धीवर),
नांदेड दक्षिण – फारूक अहमद (मुस्लीम),
लोहा – शिवा नारांगले (लिंगायत ),
औरंगाबाद पूर्व – विकास दांडगे (मराठा),
शेवगाव – किसन चव्हाण (पारधी),
खानापूर – संग्राम माने (वडार)