महाराष्ट्र बंद बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निर्णय…
मुंबई – बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या (२४ ऑगस्ट) राज्यामध्ये बंद पुकारला आहे. मात्र, अशाप्रकारे बंद घोषित करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी पार पडली. त्यावर महाविकास आघाडीने पुकारेला बंद बेकायदेशी आहे, अशा संवेदनशील घटनाबाबत कोणीही बंद पुकारू शकत नाही, तरीही कोणी बंद पुकारून आंदोलन केलं तर सरकारला कायेदशीर कारवाई करण्याचे अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.