kalyan

महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावणारा जेरबंद…

कल्याण -वाशिंद रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावणाऱ्या एकाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश धुमाळ असे या चोरट्याचे नाव असून, तो मूर्तीकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिंद रेल्वे स्थानकात लोकल सुरु होताच दारात उभा असलेल्या दिनेशने महिलेच्या गळ्यातील हिसकावली आणि पळ काढला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी शोध सुरु करत स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले आणि त्याआधारे दिनेशला अटक केली.

दरम्यान, पैशांची गरज असल्याने त्याने हि चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page