राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…
नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने ९ राज्यांमधील राज्यसभेच्या १२ जागांसाठी पोट निवडणुका जाहीर केल्या असून, महाराष्ट्रातील दोन जागांचा त्यात समावेश आहेत. उदयनराजे भोसले आणि पीयूष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी ३ सप्टेंबरला मतदान होऊन मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगानुसार, राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओरिसा या ९ राज्यांतील १२ जागांवर निवडणुका होणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून २१ ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. २२ ऑगस्ट रोजी स्क्रीनिंग होणार आहे.
आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट आणि बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओरिसामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मतदानाचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.