World
काठमांडूमध्ये विमानाचा भीषण अपघात…
नेपाळ – नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान उड्डाण करताना जमिनीवर कोसळलं आणि विमानाला आग लागली.
या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू असून, पायलट बचावला आहे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान काठमांडूहून पोखऱ्याला जात होते. त्यावेळी उड्डाण करताना हे विमान जमिनीवर कोसळलं आणि हि दुर्घटना घडली.