आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा!…
मुंबई – आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यापासून ६ महिन्याचा वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
मुख्यमंत्र्याच्या निर्णयानुसार, २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे, आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील. कारण, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्यांचा अवधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.