अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर…
New Delhi – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदलाची घोषणा देखील करण्यात आली आहे. कर कमी केल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. कॅन्सर औषधांना कस्टम ड्यूटीतून सुट दिली आहे. त्यामुळे कॅन्सरवरील ही अत्यंत महागडी औषधे स्वस्त होणार आहेत.
कोणत्या गोष्टी स्वस्त होणार?
मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रीक वाहनं, सौरऊर्जा पॅनल, एक्स रे मशीन, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, सोनं आणि चांदीचे आणि प्लॅटिनमचे दागिने, लिथियम बॅटरी, माशांपासून बनवलेली उत्पादने तर पीवीसी फ्लेक्स आणि प्लास्टिकच्या वस्तू या महाग होणार आहेत.
नोकरदार वर्गासाठी…
EPFO अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, एका महिन्याच्या पगाराच्या 15,000 रुपयांपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तीन हप्त्यांमध्ये जारी केला जाईल, कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत EPFO योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिलं जाईल, नियोक्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, सरकारनं अर्थसंकल्पात म्हटलं आहे की, अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मासिक योगदानाची दोन वर्षांसाठी 3 हजार रुपयांपर्यंत परतफेड केली जाईल.
नव्या कररचनेमध्ये बदल…
3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही, 3 ते 7 लाखांपर्यंत 5 टक्के आयकर, 7 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्नावर 10 टक्के आयकर, 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के आयात कर, 12 ते 15 लाखांवर 20 टक्के आयकर, 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर.
महत्त्वाच्या घोषणा…
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना 5,000 रुपये मासिक भत्ता मिळणार पीएम आवास योजना-शहरी 2.0 अंतर्गत, 1 कोटी कुटुंबांना घरे दिली जाणार, शहरी घरांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देण्यासाठी सरकार व्याज अनुदान योजना आणणार, पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, प्रथमच EPFO मध्ये नोंदणी करणाऱ्यांना 15,000 रुपयांची मदत मिळणार, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तब्बल १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार, शेतकरी, युवक, महिला, गरीब यांच्या विकासासाठी विविध योजनांच्या राबवल्या जाणार, महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी सरकारने 3 लाख कोटी रुपयांहून अधिकची तरतूद केली आहे, भाजीपाला उत्पादन आणि पुरवठा साखळीसाठी अधिक एफपीओ तयार केले जाणार, शेतजमिनी आणि शेतकऱ्यांच्या नोंदी डिजिटल करण्यावर भर दिला जाईल, हवामान अनुकूल बियाणे विकसित करण्यासाठी सरकार खाजगी क्षेत्र, तज्ञ आणि इतरांना अधिकचा निधी दिला जाणार.
आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा…
आंध्र प्रदेशला 15 हजार कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या शिवाय आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या विकासासाठीही मोठा निधी दिला जाईल असे सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. आंध्र प्रदेशला या अर्थ संकल्पात विशेष महत्व दिले गेले आहे. शिवाय आंध्रमध्ये रस्त्यांचे जाळेही उभारले जाणार आहे. पुरनियंत्रणासाठीही आंध्र प्रदेशला निधी दिला जाणार आहे. विशाखापट्टणम ते चेन्नई असा या कॉरिडोअरची घोषणाही या अर्थ संकल्पात केली आहे. त्याच बरोबर पंतप्रधान गृह योजनेसाठी आंध्रला 26 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बिहारसाठी मोठ्या घोषणा
बिहारमध्ये नवीन विमानतळ, क्रिडांगण, रूग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय कौशल्य विकास केंद्र बिहारमध्ये उभारले जाणार आहे. बिहारमधील रस्त्यांसाठी 26 हजार करोड दिले जाणार आहेत. त्याच बरोबर बिहारमध्ये नवा पॉवर प्रोजेक्ट उभारला जाईल. पूर नियंत्रणासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पर्यटनाच्या विकासातही बिहारला झुकते माप देण्यात आले आहे. गया इथल्या मंदिरांचा विकास केला जाणार आहे. शिवाय नालंदा विद्यापीठाला पर्यटन केंद्र बनवले जाईल. बिहारमध्ये महाबोधी कोरीडोअर बनवण्यात येईल.