अहमदाबादमध्ये विमान कोसळलं!…

gujarat – अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील नागरी वस्तीत हे विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

माहितीनुसार, हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला जाणार होते. या विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून उड्डाण घेतले. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या १० मिनिटाला हे विमान थेट जमिनीवर आदळले. या अपघातात विमान जळून खाक झालं आहे. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या भागात घरे आहेत.
दरम्यान, या विमानात २४२ प्रवासी, २ वैमानिक आणि १० कर्मचारी होते. २४२ पैकी १६९ प्रवासी भारतीय होते, ५३ ब्रिटिश नागरिक होते, १ व्यक्ती कॅनेडियन होता तर ७ लोक पोर्तुगालचे होते.