फसवणूक झालेली रक्कम टिळक नगर पोलिसांच्या मदतीने मिळाली परत…

dombivali – शेअरमार्केटमध्ये अधिकचा परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झालेल्या एकूण 27,85,500/- रुपयांपैकी 9,85,008/- रुपये संबंधित व्यक्तीला परत मिळवून देण्यात टिळक नगर पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाच्या आदेशाने ती रक्कम तक्रारदाराला परत देण्यात आली.
शेअरमार्केटमध्ये अधिकचा परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने एकूण 27,85,500/- रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार टिळक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी 418/2024 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम-66(क)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करून याबाबत ताबडतोब National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार रजिस्टर केली.
National Cyber Crime Reporting Portal वर फिर्यादी यांची तक्रार रजिस्टर केल्यामुळे फिर्यादी यांचे एकूण 27,85,500/- रुपये फसवणूक रक्कमे पैकी एकूण 9,85,008/- रक्कम होल्ड करण्यात आली. दरम्यान, एकूण 9,85,008/- रुपये होल्ड रक्कम न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी यांना परत करण्यात आली.
सदरची यशस्वी कामगिरी टिळक नगर पोलीस ठाण्याचे वपोनिरी. विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग पिठे सहा.पोलीस निरिक्षक, पो.शि.प्रकाश मुंडे, पो शि अजितसिंह राजपुत, पो ना विनोद बच्छाव यांनी केली आहे.