अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एकास अटक…

thane – अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एका रिक्षाचालकास गुन्हे शाखेच्या घटक ५ पोलिसांनी अटक केली आहे. समाधान सुर्यवंशी असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, सदरबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि याचा गुन्हे शाखा घटक ५ कडून समांतर तपास चालू होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे रिक्षाचालक समाधान सुर्यवंशी यास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, सदर गुन्हाचा पुढील तपास कासारवडवली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिदि, सहा. पोलीस निरीक्षक पल्लवी कगेपाटील, सहा. पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोउपनिरी तुषार माने, स.पो.उप. निरी/चौधरी, पो. हवा/निकम, पोहवा/ शिंदे, पोहवा/ कार्ले, पोहवा/ रावते, पोहवा / पालांडे, पोहवा / काटकर, पो. हवा/ पाटील, पो. हवा / जाचव, मपोहवा / गिते, मपोहया/महाले, पो.ना/ गार्डे, पोना/ बंडगर, पोना/ ठाणेकर, पो.शि/ शेडगे, पोशि/ शिकारे, पोशि/ यादव यांनी केली आहे.