पुण्यात ५० कोटींचे ड्रग्ज जप्त…
पुणे – पुण्यात डीआरआय (Directorate of Revenue Intelligence) च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत एका वाहनातून अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. डीआरआयने तब्बल १०१ किलो मेथाक्युलोन जप्त केले असून, याची किंमत ५० कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
तेलंगणा येथून महाराष्ट्रात येणाऱ्या एका वाहनात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार तेलंगणा राज्याची वाहन नोंदणी असलेले हे वाहन पुण्यात आले त्यावेळी अधिकाऱ्यांनी ते थांबवत आणि त्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक मोठे पिंप आढळून आले. त्या पिंपामध्ये हा अंमली पर्दाथांचा साठा ठेवण्यात मिळून आला.
दरम्यान, अटक करण्यात आलेले ५ जण महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली, हैदराबाद येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.