ठाणे
ठाण्यात ३० लाखांचे चरस जप्त…

ठाणे – ठाण्यातील कोपरी परिसरातून ३० लाख रुपयांचे २ किलो ६० ग्रॅम चरस जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत कुमार सिंग आणि प्रेमशंकर ठाकूर अशी या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखा, घटक ५, पोलिसांनी हि कारवाई केली.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कोपरीतील मंगला हायस्कुल जवळून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ३० लाख रुपयांचे २ किलो ६० ग्रॅम चरस जप्त केले. तसेच कोपरी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.