पवईत अतिक्रमण कारवाई दरम्यान दगडफेक…

मुंबई – पवई परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पवईच्या भीमनगर परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जय भीमनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे.
येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली. त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा मारा केला. यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील जवान प्रोटेक्शन शील्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात बचावले. मात्र, या तुफान दगडफेकीत ५ ते ६ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.