डोंबिवलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील ‘ग’ प्रभाग क्षेत्र आणि राम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीप टॉप स्वीटच्या बाजूला असलेल्या सिद्धी चायनीज दुकानात काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता.
या घटनेत ९ जण जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजू राजभर असे याचे नाव आहे.

दरम्यान, या घटनेनंतर अजूनही राम नगर पोलिसांनी संबंधित आरोपीना अटक केली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हे दुकान बेकायदेशीर असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर दुकानांना कोण अभय देत आहे? इतके दिवस उलटूनही अजूनही आरोपीना का अटक नाही? असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. डोंबिवलीमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. प्रत्येकवेळी डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ खेळाला जात आहे. जर आरोपी मोकाट राहिले तर कायद्याचा धाक कसा राहणार त्यामुळे लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई व्हावी असे डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे.