महाराष्ट्र
मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली…

मुंबई – मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. महाड तालुक्यातील नांगलवाडी गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली.
दरड कोसळल्यामुळे मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. पोलिसांकडून स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरड हटवण्यात आली आहे.
दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.