डोंबिवली

डोंबिवलीत डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू…

डोंबिवली – भरधाव डंपरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेतील सम्राट अशोक चौकात रविवारी (०२ जून २०२४) दुपारी घडली. मृत महिला आपल्या पतीसह पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम आटोपून घरी जात असताना हा अपघात घडला. स्नेहा दाभिलकर असे मृत महिलेचे नाव असून, अपघातानंतर पती-पत्नी दोघांना तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र महिलेला मृत घोषित करण्यात आले. तर,तिच्या पतीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा दाभिलकर आणि त्यांचे पती अशोक दाभिलकर हे पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गेले होते. घरी परत येताना डोंबिवली पश्चिमेतील सम्राट अशोक चौकात डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर स्नेहा डंपरच्या मागच्या चाकाखाली गेल्या आणि अशोक हे दुसऱ्या बाजूला पडले. त्यांना तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे स्नेहा यांना मृत घोषित करण्यात आले आणि अशोक यांच्यावर  प्राथमिक उपचार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page