महाराष्ट्र

भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर…

मुंबई – भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.  भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे.  कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाने संधी दिली आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page