मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या २ परीक्षा पुढे ढकलल्या…

मुंबई – मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या २ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई विद्यापीठाने शनिवार, १ जून रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी’ शाखेची सत्र ८ आणि बीएमएस (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे विद्यापीठाने कळवले आहे.
तसेच या मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठातील संलग्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १ जून २००४ रोजी मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या शनिवार सुट्टी दिल्याने महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येणे अनिवार्य असेल.