महाराष्ट्र

pune – पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आईला अटक…

pune – पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना पुणे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यासंबंधात ही अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात आरोपीचे रक्ताचे नमुने कोणा महिलेच्या रक्ताच्या नमुन्याशी बदलल्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या समितीला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा रक्ताचा नमुना कोणा महिलेच्या रक्तासोबत बदलण्यात आलं होतं. रक्ताचा नमुना बदलण्यासाठी आरोपीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना तीन लाखांची लाच दिली होती. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्याच रक्ताच्या नमुन्यासोबत अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा संशय क्राईम ब्रांचकडून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page