डोंबिवली
डोंबिवलीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेला एका चायनीजच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘ग’ प्रभाग क्षेत्र आणि राम नगर पोलीस स्टेशन हद्दीतील टीप टॉप स्वीट च्या बाजूला बेकायदेशीर असलेल्या सिद्धी चायनीज या दुकानात संध्याकाळी ५ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून, या घटनेत ८ ते ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच राम नगर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण स्फोट झाला हॊता. त्या घटनेत अनेकजण जखमी झाले, मृत्युमुखी पडले आहेत. आणि आता हा आणखी एक स्फोट त्यामुळे अशा घटनांमुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.