ठाणे
तलवारी बाळगणाऱ्या चौघांना अटक; ४ तलवारी हस्तगत…

ठाणे – तलवारी बाळगणाऱ्या चौघांना शिळ डायघर पोलीसांनी अटक करून ४ तलवारी हस्तगत केल्या. १) जिवन गंगाराम वालीलकर २) मोहंमद गुलजार पिरमोहंमद खान उर्फ राहुल उर्फ काल्या ३) मोहंमद सोहेल रईस खान ४) मोहंमद राशिद अब्दुल हय शाह अशी या चौघांची नावे आहेत.
सोशल मिडियावर तलवारीने केक कापत असताना व तलवारी जवळ बाळगणाऱ्या इसमांचे फोटो पोलिसांना मिळाले होते. त्याआधारे पोलिसांनी वरील सदर इसमांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ४ तलवारी हस्तगत केल्या असून त्यांच्याविरुध्द शिळ डायघर पोलीस ठाण्यात एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.