लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेच्या घरात सापडले घबाड…

बीड – १ कोटीची लाच मागणारा बीड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या चाणाक्यपुरी येथील घराची झाडाझडती घेतली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घबाड आढळून आले. तब्बल एक कोटी आठ लाख ७६ हजार 528 रुपयांची रोकड, सोन्याची बिस्किटे व दागिने असे ९७० ग्रम असे ७२ लाखांचा ऐवज, साडे पाच किलो चांदी ज्याची अंदाजे किंमत ४ लाख ६२ हजार आहे. याशिवाय बारामती व इंदापूर येथे फ्लॅट, बारामती व परळी येथे प्लॉट व इंदापूर येथे व्यापारी गाळा व इतर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात लाचेच गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी हरिभाऊ नारायण खाडे हा पसार आहे. हरिभाऊ खाडे यांचे चाणक्यपुरी येथील घराची घर झडती घेतली असता वरील प्रमाणे मुददेमाल मिळुन आला आहे.