मुंबई
मालकिणीचा खून करणारा नोकर गजाआड…

मुंबई – मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तानीया हाईटस, ६६ नेपियन सी रोड येथे राहणाऱ्या एका महिलेचा २ सोन्याच्या बांगड्यांसाठी गळा आवळून खून करणाऱ्या नोकरास मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. कन्हैया कुमार संजय पंडित असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, कन्हैया कुमार संजय पंडित याने ज्योती शहा (मालकीण) हीचा गळा आवळून खून केला आणि तिच्या हातातील ३,००,०००/- रु. किंमतीच्या हिंरंजडीत दोन सोन्याच्या बांगडया चोरी करून पळून गेला असल्याबाबत मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ पोलिसांच्या मदतीने भुसावळ येथून कन्हैया कुमार संजय पंडित याला अटक केली.