महाराष्ट्र
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला…

पुणे – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. . निखिल वागळे पुण्यात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाला जात असताना, डेक्कन भागातील खंडोजी बाबा खोपडे चौकात हि घटना घडली.
भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली. पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांची गाडी फोडण्यात आली