भररस्त्यात पतीकडून पत्नीवर हल्ला…

Mumbai – भररस्त्यात पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यानंतर पतीने स्वतःचा हात कापून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील खाडिलकर रोडवर सकाळच्या सुमारास हि घटना घडली असून, याप्रकरणी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच दोघांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
सागर बेलोसे असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे. तर शीतल चव्हाण असे पत्नीचे नाव आहे. सागर बेलोसेसोबत सतत वाद होत असल्याने त्याची पत्नी तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली होती. सागरने अनेकदा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. त्यामुळे पत्नी कामावर जात असताना सागरने तिच्यावर हल्ला केला. पत्नीवर हल्ला केल्यानंतर सागरने मनगट कापून स्वतःला इजा केली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.