लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे – ठाणे तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला २ लाख रुपये लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. महेंद्र गजानन पाटील असे मंडळ अधिकाऱ्याचे नाव तर वाजीद मेहबुब मलक असे खासगी इसमाचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांचे रेमण्ड कंपनी, ठाणे येथे चालु असलेल्या साईटवर खोदकाम करण्याकरीता मिळालेल्या परमिशनपेक्षा जास्तीचे खोदकाम ते करीत असून त्याबाबतचा खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयास सादर न करण्याकरीता महेंद्र गजानन पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे १०,००,०००/- रु. लाचेची मागणी करत तडजोडीअंती ६,००,०००/- रु. स्विकारण्याचे मान्य करून त्यापैकी लाचेचा पहिला हप्ता २,००,०००/- रु महेंद्र पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून घेऊन ती रक्कम वाजीद महेबुब मलक यांच्याके दिली असता या दोघांना एसीबीने रंगेहात पकडले.