मुंबई

मुंबईत १ कोटींचा गुटखा जप्त…

मुंबई – गुन्हे शाखेने १ कोटींचा गुटखा जप्त करून ३ जणांना अटक केली आहे. इब्राहिम मैनुद्दीन इनामदार, संतोषकुमार रामसिंहासन सिंग आणि कलीम वाहिद हसन खान अशी या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ९ पोलिसांनी दा. नौ. पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ७८,१,२००/- रु. किंमतीचा अवैध गुटखा व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रक जप्त करत एकास अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून कांदिवली येथे पार्क केलेल्या एका टेम्पोमधून रू. २८,१७,६००/- किंमतीचा गुटखा व सदर टेम्पो जप्त करून दोघांना अटक केली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १,६,१८,८००/-रु. किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा आणि ३३,००,०००/- रु. किंमतीचे २ वाहने असा एकूण १,३९,१८,८००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page