मुंबई
आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी…

मुंबई – ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकला आहे.
जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी हि छापेमारी सुरू आहे. वायकरांशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. मंगळवारी सकाळी ईडीचे १० ते १२ जणांचे पथक रवींद्र वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर या पथकाने झाडाझडती सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री स्पोर्ट्स क्लब, सुप्रीमो बँक्विटच्या नावाने घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच बीएमसीच्या जागेवर फाईव्हस्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा, फाईव्हस्टार हॉटेलची किंमत ५०० कोटींची असल्याचा, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील जागेवर बांधकाम केल्याचा असे सर्व आरोप त्यांच्यावर आहेत.