सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक…

डोंबिवली – सोन्याचे दागिने चोरी करणा-या एका महिलेस गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. गंगुबाई उर्फ गिता लक्ष्मण दळवी असे या महिलेचे नाव असून, तिने घरकाम करत असलेल्या घरातून १० तोळे सोन्याचे दागिने चोरले होते.
विष्णूनगर पोलीस ठाण्यात दागिने चोरी झाले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलिसांनी करून, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गंगुबाईला अटक करून तिच्याकडून १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील सहा पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.नि. राहुल मस्के, सपोनि संदिप चव्हाण, पोउपनि संजय माळी, पोहवा विश्वास माने, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा दत्ताराम भोसले, पोहवा किशोर पाटील, पोहवा विलास कडु, मपोड़वा मेघा जाने, मपोहवा मिनाक्षी खेडेकर, मपोशि मंगल गावित, पोना महाजन, पो.शि. गुरूनाथ जरग, पोशि नवसारे, पोशि शेकडे, पोशि लांडगे चापोहवा अमोल बोरकर यांनी केली.