महाराष्ट्र
भाजप आमदाराची पोलिसाला मारहाण…

पुणे – भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचा उद्घाटन कार्यक्रम होता, त्यावेळी हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुखांना अजित पवार यांच्यासमोरच मारहाण केली. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना बाजूला उभा असणाऱ्या पोलीसाला देखील त्यांनी मारले.