तडीपार गुंडाना अटक…

डोंबिवली – तडीपार सराईत गुंडाना अटक करण्यात कल्याण गुन्हे शाखा, घटक ३, पोलिसांना यश आले आहे. आतिष राजु गुंजाळ आणि गणेश अशोक अहिरे अशी या दोघांची नावे आहेत.
गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे पो.हवा. दत्ताराम भोसले यांना बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेचे व.पो. निरी. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आतिष गुंजाळ यास डोंबिवली पूर्वेतील बंदिश पॅलेस हॉटेलजवळील चौकातून चॉपरसह अटक केली. तर गणेश अहिरे यास डोंबिवली जिमखानाजवळून अटक केली.

दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतिष गुंजाळला मुद्देमालासह डोंबिवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच गणेश अहिरे याला टिळक नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, आतिष गुंजाळ याच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात किडनॅपींग, घातक शस्त्र जवळ बाळगुन गंभीर दुखापत करणे, अंमल पदार्थ विकी करणे अशा प्रकारचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. तर गणेश अहिरे याच्यावर डोंबिवली व टिळकनगर पोलीस ठाण्यात चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. .
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, व निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे व.पो. निरी. नरेश पवार, पो.नि. राहुल मस्के, सपोनिरी. संदिप चव्हाण, पो.उप निरी. संजय माळी, पो.हवा. दत्ताराम भोसले, पो.हवा. बापुराव जाधव, बालाजी शिंदे, रविंद्र लांडगे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, अनुप कामत, विनोद चन्ने सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण यांनी केली आहे.