डोंबिवली
डोंबिवलीत रिक्षाचा अपघात…

डोंबिवली – डोंबिवलीतील चार रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटली आणि रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. त्यावेळी रिक्षेत ३ शाळकरी विद्यार्थी बसले होते. त्यांच्यासह रिक्षा पुढे गेली आणि थेट फुटपाथवर चढली. उपस्थित नागरिकांनी वेळीच रिक्षा अडवली आणि रिक्षेत असलेल्या तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकवर कारवाई करत त्याला ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.