चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा गजाआड…

डोंबिवली – चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा, घटक – ३ कल्याण, पोलिसांनी अटक केली आहे. सनी ऋषीपाल तुसांबड असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, एक इसम डोंबिवली पूर्वेतील शेलारनाक्यावरून घरी जाण्याकरिता रिक्षात बसला असताना सनी ऋषीपाल तुसांबड याने त्याचा साथीदार अक्षय अहिरे याच्यासोबत मिळून सदर इसमाच्या पोटाला चाकु लावून त्याला मारहाण करून त्याच्याकडील १०,०००/- रू किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून तसेच गुगल पे च्या आधारे बँक खात्यातून १२,१००/- रू काढून घेतलेबाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४८०/२०२३ भादंवि कलम ३९४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे बावन चाळ, रेल्वे मैदानाजवळ, डोंबिवली पश्चिम येथून सनी ऋषीपाल तुसांबडला अटक केली.
सदर यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो. निरी. राहुल मस्के, सहा. पो निरी. संदिप चव्हाण, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोहवा विश्वास माने, पोहवा बापुराव जाधव, पोकों गुरूनाथ जरग, पोकों गोरक्ष शेकडे यांनी केली.