अंमली पदार्थ विक्री करणारे दोघे अटकेत…

डोंबिवली – अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आर्शद करार खान आणि शादाबुदीन मोईनुद्दीन सय्यद अशी या दोघांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ ग्रम वजनाची सफेद रंगाची किस्टल एम.डी. पावडर (अंमली पदार्थ) जप्त केली.
मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील लोढ़ा पलावा, फेज-२, खोणी भागात २ इसम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आर्शद करार खान आणि शादाबुदीन मोईनुद्दीन सय्यद या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून एकूण २,३२,०००/- रू किंमतीची ५८ ग्रम वजनाची सफेद रंगाची किस्टल एम.डी. पावडर (Methadone), १ मोटार सायकल, २ मोबाईल, २.२३,४०४/- रू रोख रक्कम असा एकूण ५,३०,४४०/- रू किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अशोक होनमाने यांच्या देखरेखी खाली पोनि राम बोपडे (गुन्हे), सपोनि सुनिल तारमळे, सपोउपनिरी, भानुदास काटकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा संजू मासाळ, पोहवा विकास माळी, पोहचा. शिरीष पाटील, पोशि. विजय आव्हाड, पोशि. अशोक आहेर, पोशि ढाकणे यांनी केली.