मराठा आंदोलनाला मोठं यश!…

नवी मुंबई – मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला अखेर यश मिळाल आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित अध्यादेशाची प्रत मनोज जरांगेंना सुपूर्द केली.
राज्य शासनाकडून यासंदर्भात काढण्यात आलेल्या या जीआरमध्ये सगेसोयऱ्याची व्याख्या करण्यात आली आहे. सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असे जीआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे.
लढा यशस्वी झाल्यामुळे मराठ्यांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले आहे.