नागरिकांचे मोबाईल हिसकावणारे अटकेत…

पुणे – रस्त्याने पायी जाणा-या नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट, १ पुणे पोलिसांनी अटक करून एकूण १,९१,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत करून ८ गुन्हे उघडकीस आणेल. धनराज शिवाजी काळुंके, विरेंद्रकुमार जगदीश प्रसाद प्रजापती आणि किशोर सुरेश कोल्हे अशी या तिघांची नावे आहेत.
सदाशिव पेठेतील हत्ती गणपती मंदिराच्या समोरील गल्लीमध्ये ३ जण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून धनराज शिवाजी काळुंके, विरेंद्रकुमार जगदीश प्रसाद प्रजापती आणि किशोर सुरेश कोल्हे या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून किं रु १,२१,०००/- चे १४ मोबाईल आणि ७०,०००/- रु किंची १ मोटर सायकल असा एकूण १,९१,०००/- किंचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच विविध पोलीस ठाण्यातील एकूण ८ गुन्हे उघडकीस आणेल.