तरुणीवर अत्याचार करून हत्या…

मुंबई – वसतीगृहातील १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळली असून तिच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक आहे. अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची समोर आले तसेच वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले मात्र सुरक्षा रक्षक बेपत्ता होता. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाचा शोध घेतला असता रेल्वे ट्रकवर त्याचा मृतदेह आढळून आला. सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.