महाराष्ट्र
दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी…

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
विभागवार निकाल
कोकण – 98.11 टक्के
कोल्हापूर – 96.73 टक्के
पुणे – 95.64 टक्के
मुंबई – 93.66 टक्के
औरंगाबाद – 93.23 टक्के
अमरावती – 93.22 टक्के
लातूर – 92.67 टक्के
नाशिक – 92.22 टक्के
नागपूर – 92.05 टक्के