महाराष्ट्र
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन…

चंद्रपूर – काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, २ मुले असा परिवार आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते.