आगे आगे देखो होता है क्या! – देवेंद्र फडणवीस…

मुंबई – काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षसदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सूरू आहे. या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘आगे आगे देखीये होता हे क्या?’, असे म्हणत सूचक वक्तव्य केले आहे.
फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी ते म्हणाले कि, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस गेल्या काही वर्षात वाटचाल करत आहे त्यातून कुठेतरी जनेतेचे नेते नाराज आहेत. ते पक्षात गुदमरत आहेत. मुख्य प्रवाहात काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे देशभरात एक ट्रेंड सुरु आहे. जनतेचे नेते अशी ओळख असणारे भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते भाजपाकडे येतील हा मला विश्वास आहे. आज मी इतकंच सांगू शकतो की, आगे आगे देखो होता है क्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.