राज्यातील २२०० मुली मार्च मध्ये बेपत्ता…

मुंबई – महाराष्ट्रातील मुली हरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च २०२३ मध्ये सुमारे २२०० मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली, याचा अर्थ सरासरी दररोज ७० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. विशेषत: १८ ते २५ वयोगटातील मुली बेपत्ता झाल्या आहेत. एकट्या फेब्रुवारी महिन्यात १८१० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
याबाबत महिला अयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट करत राज्यातून मार्च महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्याचे सांगून गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली आहे.
चाकणकर म्हणाल्या, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर मार्च महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही.
राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे. हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्याकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यकरत आहे की नाही? मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्रामही आम्ही घेतला. यामध्या राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. सद्यस्थितीतली आव्हानं आणि उपाय योजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवलाही आहे.
मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही. तर या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचं आमीष, प्रेमाचं आमीष आणि नोकरचं आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसंच या संदर्भात गृहविभागाने तातडीने पावलं उचलावीत अशीही मागणी चाकणकर यांनी केली आहे.