राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया…

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या पाडवा मेळाव्याच्या भाषणातून विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उद्धव ठाकरेंनी आता उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे विधानभवनात आले असता त्यांनी माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले गेल्या १८ वर्षांत तीच रेकॉर्ड घासून-पुसून झाली आहे. गेल्या वर्षी १४ मे ला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत मी माझं मत मांडले होते. तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता. त्याच चित्रपटाचा दाखला तुम्ही बघू शकता.
तसेच माहीम येथील अनधिकृत बांधकामावर झालेल्या कारवाईवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ते बांधकाम काही नवीन नव्हतं त्याच्या आधीही तिथे इतर पक्षांचे आमदार होते, त्यांच्याही पक्षाचे आमदार-नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनच ते बांधकाम होत. ठीक आहे जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचल असेल. नाहीतर एवढी वर्षं कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होत असेल तर मग राज्यात असणाऱ्या अशा अनेक गोष्टी त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.