राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा…

गुजरात – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानीचा खटल्यात दोषी ठरवले असून त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.
राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केला होती. राहुल गांधीविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी ३० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली वरच्या कोर्टात जाण्यासाठी सुरत कोर्टाने राहुल गांधींना ३० दिवसांचा वेळ दिला आहे.
दरम्यान, कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही असे राहुल गांधी कोर्टात म्हणाले.